नुकताच चार राज्यातील निकाल लागला आणि तीन राज्य बीजेपी तर एक राज्य काँग्रेसकडे पण या निकालामध्ये चर्चा आहे ती तेलंगणा राज्याची .
2009 ते 2023 पर्यंत एक हाती सत्ता असलेल्या बीआरएस संपूर्ण भारतात विस्तार करू पाहत होती याचे ताजे उदाहरण म्हणजे " महाराष्ट्रातील राजकारणात " बीआरएस ला चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी चर्चा सुरू होती एवढेच नाही तर अजित पवार यांनीही बीआरएस ला दुर्लक्ष करून चालणार नाही असंही सांगितलं होतं.
पण महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व निर्माण करणारी केसीआर ( KCR ) यांची बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) पार्टी आपल्याच घरात कोणत्या कारणामुळे पराभव झाली जाणून घेऊया बोल मराठी या माध्यमातून.
केसीआर ( KCR ) यांनी 2001 साली टीआरएस पार्टीची स्थापना केली आणि तेलंगणा राज्य बनण्यापासून सतत नऊ वर्ष एकहाती सत्ता मिळवली .
पण 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केसीआर यांनी पार्टीला दुसऱ्या राज्यात पसरण्यासाठी टीआरएस ( तेलंगाना राष्ट्र समिती) च नाव बदलून बीआरएस ( भारत राष्ट्र समिती ) केलं आणि हीच पहिली चूक.
कारण तेलंगाना नाव हे तेलंगणा येथील जनतेच्या अस्मितेशी जुळलेलं होतं पण केसीआर यांनी टीआरएस च नाव बदलन हे जनतेच्या जास्तच जिव्हारी लागलं. एवढंच नाही तर पक्षातील नेते सुद्धा हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो असं मान्य करत होते.
दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे मुस्लिम समाजाकडे केसीआर यांच दुर्लक्ष करण मग तो मुस्लिम समाजाला 12 टक्के आरक्षण किंवा बाकीचे मुस्लिम समाजासाठी केलेले प्रॉमिस केसीआर यांनी पूर्ण केले नाही.
एका सभेत तर केसीआर यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत" तुझ्या बापाला सांग "असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे मुस्लिम समाज अतिशय नाराज होता. तेलंगणात 40 ते 50 मुस्लिम बहुल सीट जे आतापर्यंत बीआरएस ला मिळायची या वेळेस काँग्रेसकडे वळाली.
तिसरं प्रमुख कारण म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी केसीआरच्या लोकप्रियताला चांगलाच टार्गेट केलं बीआरएस भाजपाची बी टीम आहे आणि दोघे एकमेकांसोबत मिळालेले आहे हा मुद्दा राहुल गांधी आणि काँग्रेसने वारंवार तेलंगणात उचलला.
आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या पार्टीला नॅशनल पार्टी बनवण्याच्या शर्यतीत केसीआर यांनी स्वतःच्या राज्याकडे दुर्लक्ष केलं आणि हे केसीआर यांना चांगलच महागात पडले.
आणि पाचवं कारण म्हणजे घराणेशाही आणि तेलंगणात सत्तेचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि आपल्या आमदारांना टाईम न देणे हे देखील केसीआर यांना यावेळेस निवडणुकीत हरण्यासाठी कारणीभूत ठरले.
याच 5 प्रमुख कारणामुळे केसीआर यांना तेलंगणामध्ये पराभव पत्करावा लागला