मराठा आरक्षण (Maratha Aarakshan ): मनोज जरांगेंचा सरकारला 3 दिवसाचा अल्टिमेटम नाहीतर पुन्हा आंदोलन :Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम कारण महिन्याभरापासून चाललेला मराठा आरक्षणाचा निर्णय अजूनही लांम्बणीवर चाललेला आहे असे दिसत आहे . मराठा आरक्षणाचा मार्ग या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागेल असेही चित्र दिसत होते .
महाराष्ट्रात "मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) " राज्य सरकार समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन फेब्रुवारीमध्ये बोलवून मराठा आरक्षण दिले जाईल .अशी घोषणा केल्याने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे एकनाथ शिंदे यांनी " आपले सरकार हा दिलेला शब्द पाळणारे सरकार "आहे असेही म्हटले आहे आणि जरांगे पाटील यांनी सबुरी आणि श्रद्धा ठेवावी असा एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे
पण काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी शिंदे सरकारच्या या घोषणेवर ताशेरे ओढले आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे आणि एकदा की आचारसंहिता लागली की विशेष सत्र किंवा विशेष अधिवेशन बोलवता येत नाही असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण ( Maratha Aarakshan /Maratha reservation ):आचारसंहितेत विशेष अधिवेशन बोलता येत का ?
मराठा आरक्षणावर कायदे तज्ञ " असीम सरोदे " यांनी म्हणाले की ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजनीतिक मुद्दा बनलेला दिसत आहे यावर सुप्रीम कोर्ट " आचारसंहितांमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची परवानगी देणार नाही ".
यानंतर मनोज जारंगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सरकारला 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने 24 डिसेंबर तारखेच्या आतच मराठा आरक्षण( Maratha Aarakshan ) देण्यात यावे असे मनोज जारंगे पार्टी यांनी शिंदे सरकारला इशारा देण्यात आला नाहीतर आम्ही "पुन्हा आंदोलनावर ठाम "आहे असे जरांगें पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले 24 डिसेंबर नंतर सरकारला एकही तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार नाही असे म्हणत जाणारी पाटील यांनी बोलताना सांगितले