सत्तेच्या बळावर पुन्हा एकदा औरंगाबाद शहरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ.
हा लेख कोणत्याही राजकीय पार्टीचा समर्थन करत नाही.
हो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत औरंगाबाद शहराच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मागील वर्षापासून कसा मांडला जातोय तरी ही औरंगाबाद येथील आमदार आणि शिक्षक आमदार गप्प का?
जर तुम्ही Article वाचत असाल तर आपला स्वतःचा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून , एक विद्यार्थी, एक पालक आणि एक सुशिक्षित मतदार, म्हणून हा लेख वाचावा.
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की औरंगाबाद येथील शिक्षण व्यवस्था हे दुसऱ्या शहरापेक्षा खूप हलाखीची आहे. यालाच लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2014 साली औरंगाबाद शहरासाठी IIT आणि IIM सारख्या नॅशनल युनिव्हर्सिटी औरंगाबाद शहरासाठी मंजूर केले होते परंतु 2014 साली या संस्था महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबाद येथून या संस्था नागपूर येथे नेल्या .
Also Read : Best Earn Money App For Android in hindi in 2021 india
आता परत एकदा 2021 मध्ये केंद्र सरकारने पुन्हा एकदा औरंगाबाद या शहरासाठी IIT आणि IIM सारख्या नॅशनल युनिव्हर्सिटी औरंगाबाद शहरासाठी मंजूर केले पण आताही तसंच महाराष्ट्र राज्य सरकारने या संस्था काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली पुणे येथे नेल्या.
प्रश्न असा आहे की औरंगाबाद करांचा हा हक्क कित्येक वर्षापासून दाबला जातोय आणि त्यावर औरंगाबाद शहरातील एकही आमदार विधानसभेत बोलायला तयार नाही या आमदारांना फक्त आणि फक्त तुमचे vote पाहिजे.
ज्या लोकांना आपण आपल्या हक्कासाठी निवडून देतो त्यांना फक्त इलेक्शन जवळ आले की संभाजीनगर ,खान पाहिजे की बान पाहिजे हेच मुद्दे आठवतात मात्र विधानसभेत औरंगाबाद येथील विकासाबाबत किंवा विद्यार्थ्यांचे भविष्य बाबत काहीच आठवत नाही मग तो औरंगाबाद शहरासाठी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट असो किंवा आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्था.
या मुद्द्यांवर फक्त बोलणारा माणूस म्हणजे औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील . बाकी सत्तेत असणारे आमदार गप्प का ?
औरंगाबाद शहर IT आणि computer क्षेत्रामध्ये खूप मागे आहे आणि खास करून कॉम्प्युटर क्षेत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे योग्य शिक्षण आणि त्यासाठी मिळणारे योग्य मार्गदर्शन हेही मिळत नाही . औरंगाबाद येथे जास्त कॉलेजेस किंवा संस्था या अर्थापेक्षा जास्त राजकीय नेत्यांच्या आहेत तरी औरंगाबाद शहरातील विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित आहेत.
Also Read:
What is Pegasus Spywere? What is Pegasus? How does Pegasus work?
या विषया वर पुन्हा एकदा विधानसभेत औरंगाबाद शहरातील आमदारांनी प्रश्न मांडला तर नक्कीच IIM & IIT या युनिव्हर्सिटी औरंगाबाद येथे पुन्हा येतील आणि विद्यार्थ्यांचे भविष्याला नवीन चालना मिळेल परंतु या राजकीय नेत्यांना साहेबांचा आदेश आणि स्वतःच्या विकासा व्यतिरिक्त काहीच दिसत नाही.
आता माझा प्रश्न औरंगाबाद शहरातील पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि सुशिक्षित मतदारांसाठी आहे .जर तुम्ही इलेक्शन मध्ये संभाजीनगर ,औरंगाबाद ,खान पाहिजे की बान अशा मुद्यांना लक्षात ठेवून जर Vote करत असाल तर नक्कीच तुमच्या मुलांचा भविष्य अंधारात आहे . औरंगाबाद येथील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना पकोडे विकण्या व्यतिरिक्त पर्याय नसेल.
आणि जर तुम्ही एका सुशिक्षित आणि चांगलं राजकीय नेता जर विधानसभेत पाठवलं जो तुमच्या हक्कासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्याच्या हक्कासाठी , विधानसभेत किंवा लोकसभेत लढणारा असेल तर नक्कीच IIT आणि IIM यासारख्या संस्था औरंगाबाद मध्ये येथील आणि औरंगाबाद शहरातील शिक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा चांगला होईल.
आता हे तुमच्यावर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीचा भविष्य अंधारात पाहिजे की उज्वल भविष्य पाहिजे ?
sr.no | product name | rating | clickhere |
2 | iphone | ||
3 | panasonic |